चला जाऊ या आज, दर्शनास तुकयाच्या
डोळे भरून पाहू या, हा काठ इंद्रायणीचा
आसुसले होते मन, दर्शनास तुकयाच्या
आज योग आला , हा संमतीने सर्वांच्या
तुकोबाच्या पादुका असती, देहू गावात
दर्शन घेऊन आठवू, तुकोबाला मनांत
तुकयाच्या गाथेला वंदन करू, मनोभावे
पावन झाली सरिता,गाथेच्या स्पर्शभावे
वैकुंठाला जाती, तुकाराम देहू गावातून
सदेह, लोकासमक्ष पुष्पक विमानातून
सांगणे होते त्यांचे, सोडा हो अभिमान
गात राहा सदा, विठ्ठलाचे गुणगान
भुलून जाऊ नका, बरे बाह्य स्वरुपाला
पाहा असलेल्या, अंतरीच्या प्रेमाला
ठेवा बंधुभाव, स्मरण करा विठ्ठलाचे
केले एवढे जर,सार्थक होईल जन्माचे
तुकाराम बीजेला होई, देहूत हो सोहळा
भक्तगण म्हणती हो, पाहू या तो डोळा