दिवाळी

प्रेमगंध अन ऋणानुबंध, असे क्षणाक्षणाला

चहूकडे सुखाची उधळणं, असे दिवाळी सणाला!!

गंध भावनेचा, हा मनामनात वसे,

घराघरात प्रवेशणारे, लक्ष्मी पावलांचे ठसे,

लखलखते दिवे अन नवचैतन्याची जाण मनाला

चहूकडे सुखाची उधळणं, असे दिवाळी सणाला!!

-तुषार सु. बोराडे.