संतांच्या पावन अशा या भूमीवर
वसले असे पाहा सुंदर पुण्यनगर
टिळक आगरकरासम मान्यवर
कर्मभूमी करतात ज्या भूमीवर
कर्मभूमी करतात ज्या भूमीवर
तेथे धाम माझे सुंदर
ते माझे घर
रम्य असे परिसर निसर्गसुंदर
अनेक रंगाचे असती गुलमोहर
निवास ' सुरुचीचा 'या पथावर
लाऊन जातो, ध्यास मनावर
तेथे धाम माझे सुंदर
ते माझे घर
वृक्षलतांच्या दाट छायेखाली
आम्रवृक्षाची असे ती सावली
रातराणी जेथे पहा दरवळली
प्राजक्ताच्या सुगंधाने भारली
त्या भूमीवर धाम सुंदर
ते माझे घर
भारद्वाज, कोकिळ, राघु, मैना
करती कूजन मोहवती हो मना
प्रसन्न करती, आसमंत जना
शीतल लहरीत,वाहे तो पवना
त्या भूमीवर धाम सुंदर
ते माझे घर
असे इमारत पथावर उभी सुंदर
नाव 'सुरुची' ठेवले कसे कलंदर
राहत असती, अनेक मान्यवर
स्वभावाचे असती अनेक स्तर
त्या कुटुंबांचे धाम सुंदर
ते माझे घर
राहती सहाजण अलग अलग
असे जिव्हाळा, तयांत सलग
एकमेकांचे नसतात नातलग
धावती सारे येता बाका प्रसंग
असे जे धाम सुंदर
ते माझे घर
भिन्न मतांचे असती सहा जण
करती साजरा, मिळुनी हे सण
गर्वित होतो, प्रत्येक सुरुचिजन
जेंव्हा राखती परस्परांचा मान
प्रेम घेत असे जेथे आकार
ते माझे घर