" प्रश्न "

मी नेहमीच पाठवतो संदेश तिच्या नावे जरी महितीय ऊत्तर कधी मिळतच नाही...

अन आम्ही दोघेही असे का वागतो हे कारण ही कधी समजतच नाही..

पण तरी मी अधुन-मधून न चुकता पाठवतोच तिला संदेश..

ती ही सहजपणे टाळते ऊत्तर देण्याचे अगदी न चुकता..

म्हणतातच ना काही गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या की तो स्थायीभाव होतो...

हल्ली मला अशी तात्त्विक वाक्ये फार सुचतात...

वेडा होण्याची ही पहिली पायरी आहे असे मित्र म्हणतात..

काही प्रश्नांची ऊत्तरे नशिबावर सोडा असाही युक्तिवाद निघाला...

पण आजपर्यंत स्व-बळावर लढल्यावर पटकन कसा ठेवावा दैवावर हवाला...

काही प्रश्न हे प्रश्नच राहीलेले चांगले असते..

ऊत्तरे मिळाली नाहीत तरी संवाद संपण्याची भीती नसते..

मग मी स्वतःवरच वैतागतो.. सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे एकदम शोधू पहतो...

पुन्हा तिच्य विश्वात स्वतःला गुरफटून घेतो...

अन सरतेशेवटी.. पदरात अजून काही नवे प्रश्नच पाडून घेतो...

कदाचित ह्या प्रश्नोत्तराच्या सत्रालाच जीवन म्हणत असावेत बहुधा..

तर मग आम्हीही शोधू मरेपर्यंत.. आमच्या हिश्श्याच्या प्रश्नांची ऊत्तरे...

अन नाहीच सापडली ह्या जन्मात.. तर पुढे चौरयांशी लक्ष आहेतच की...

कोण म्हणते मेल्यानंतर काहीच बरोबर येत नाही म्हणुन....