वेदना

असतात अनेक प्रकारच्या मनांत संवेदना
असते त्रासदायक फार ती दुःखाची वेदना

विचार करताना मी पाहिले,वेदनांचे स्वरूप
किती प्रकार असती,आणि त्यांचे किती रूप
ठेच लागताच कळवळून, सय येते आईची
पश्चाताप होई आठवून, केलेल्या चुकीची
स्वरूप प्रेमभंगाच्या, वेदनेचे असते निराळे
वेडेपिसे करे ते, तोडी नाते जगाचे ते वेगळे
घालवता अपघातात, अवयव जर  एकादा
सलत राही वेदना मनांत,सय येई सत्रादा
घामाच्या पैशावर मारे, डल्ला जेंव्हा तस्कर
वेदना होई मनास, विसरणे नाही ते सत्त्वर
मेहनतीने केलेल्या, अभ्यासाच्या प्रबंधाला
कोणी जाळल्यावर, घरे पडती काळजाला
पाहुनी आपुल्या प्रिय, माणसाच्या मृत्युला
स्मृतीने त्याच्या खूप, वेदना होती मनाला
मातृत्वाच्या कळा,  सहन न होती मातेला
प्रसुत होताच विसरे दुःख, हर्ष होई मनाला