(चालेल तोवर चालू दे.... )

प्रसिद्ध गझलकार श्री अजय जोशी यांच्या 'चालेल तोवर चालु दे' वरून ....

बिनधास्त लिहिणे आपले चालेल तोवर चालु दे !
पाट्या इथेही टाकणे संपेल... तोवर चालु दे !

तू मारल्या थापा तरी कुठलीच ना पचली तशी...
पाचक घरी आहे तसे, पचवेल तोवर चालु दे !

केळी तुला पचली नसे - दुर्गंध थोडा वाढला...
नाकास फडके सारखे बांधेल तोवर चालु दे !

संपून गेल्यावर गझल संपेचना मिसरा तुझा...
शाई गळायाची कधी थांबेल तोवर चालु दे !

नाते तुझ्याशी ठेवले नाही कुणीही आजवर....
कोणीतरी अमुच्यात कंटाळेल तोवर चालु दे !

सागर किनारी नेहमी जातोस का तू एवढा?
लाटाळणे त्याला तुझे चालेल तोवर चालु दे !

कोणी तुझे घेता मुके दरबार त्यांचा लाजला...
हा घोळ त्याचा त्यास ना समजेल तोवर चालु दे !

(झाले बुवा एकदाचे..!)