कौतुक

कौतुक
=============
.
.
साऱ्या साऱ्या असण्याच
आज कौतुक व्हावं..
गाई-गुरं, पोर-बाळ,
धन-धान्य, देव-दैव,
भाऊराय, धन्या ठायी
धन्य धन्य व्हावं..
डोळ्या दिव्यांच्या ज्योतीनं..
तेजस तेवावं..
मना मनातल्या सुगंधानं
नखशिखान्त सजावं..
सान होऊन सोन्याच्या
चरणी झुकावं..
साऱ्या साऱ्या असण्याच
आज कौतुक व्हावं..!!
.
.
=============
स्वाती फडणीस
१९-१०-२००९