आनंदी आनंद गडे (विडंबन)

स्वाइन फ्लू आला आपल्याकडे 

इकडे तिकडे चोहिकडे
तोंडावरती रुमाल धरा 
मास्क लावून बाहेर फिरा
घरात शिरला, दिशात फिरला, हवेत विरला 
फ्लू पसरला चोहिकडे 
सर्दी, ताप, खोकला होणे
अशक्तापणा लक्षण हे 
लक्षण दिसता 'टॅमीफ़्लू' घेणे 
बेजार झालो स्वाइन फ्लूने 
फ्लू घालवू, व्यायाम करू, स्वस्थ राहू 
आता हाच मंत्र आपल्याकडे