कुणाच्या खांद्यावर (विडंबन)

सत्तेच्या खुर्चीवर...
सत्तेच्या खुर्चीवर नेत्यांचे डोळे
सत्तेसाठी उतरावे बंडखोरी करुन 
लोकांसाठी काय केले ह्यांनी रक्त ओकून?
जनहित येथे कुणी जाईल का विसरून?
तरी असे का करतात हे नेते 
खुर्चीसाठी सारे जाती येथे वेडेपिसे होउन
मतांसाठी करतात हे प्रचार म्हणून
जनतेशी देती वचने घोकून घोकून 
म्हणती हे वेडेपीर तरी होऊ आम्हीच राजे 
सत्तेच्या खुर्चीवर नेत्यांचे डोळे