केतकीच्या बनी(विडंबन)

विधानसभेच्या नेत्यांना तिथे, आला गं जोर 
निवडणूका आल्या जवळ, सुटला गं धीर 
फ्लेक्स लावले, रस्ते रंगले 
पक्षांचे झेंडे सगळीकडे फडकले
प्रचाराचा जिथे तिथे आळवला सूर 
खुर्चीसाठी नेत्यांच्या अंतरंगी डोलले
भाषणातुनी कुणी आज वचने दिले
निवडणूकांचे रंग आता चौफेर उधळले
जनहितासाठी आता त्यांना काही करावे वाटले 
रणधुमाळीचे रणशिंग विधानसभेत फ़ुंकले