त्रिकालाबाधित शब्द

एखादा माणूस स्वतःच्या गावाहून दुसऱ्या गावाला कामानिमित्त जातो. तिथे होणाऱ्या प्रश्नोत्तरात एक प्रश्न हमखास हा असतो:
तुम्ही प्रॉपर ------ चे का ?
गाळलेल्या जागेत त्या माणसाच्या मूळच्या गावाचे नाव.
उदा.
तुम्ही प्रॉपर नगरचे का ?
तुम्हा प्रॉपर बीडचे का ?

इत्यादी इत्यादी इत्यादी.

'प्रॉपर' हा शब्द या वाक्यात संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातोच जातो. खरे तर, हा प्रश्न विविध तऱ्हांनी विचारला जाऊ शकतो.
उदा.
तुम्ही मूळचे नगरचे का ?
तुम्ही बालपणापासून बीडला राहात आहात का?
तुम्ही अगदी पहिल्यापासून सांगलीचेच का ?

वर्षानुवर्षे हा प्रश्न याच शब्दासकट विचारला जात आहे.
(एरवी हा प्रश्न विचारणाऱ्यांना इंग्रजी बोलता येत नाही पण या वाक्यात न चुकता हा शब्द आणलाच जातो.)

'प्रॉपर' हा शब्द इतका कसा रुजला असावा?