गारवा

वाटला गारवा आज आगळा

पाझरे गवाक्षातुनी तो वेगळा
येई पसरत रातराणी दरवळ
पाडतो हा सुगंध मला भुरळ
गडद होई रात्र हळुच मजेत
भिनत जाई गारवा तो रंध्रात
हळुच पाहिले मी मग नभात
चंद्र रोहिणीला घेत होता कवेत
शिरशिरी उठली कशी ती अंगात
माझी प्रिया झोपे मला बिलगत
घेतला देह तिचा हळुच कवेत
धन्यवाद दिले गारव्यास मनांत