अलंकापुरी

इंद्रायणी  काठी, गाव एक सुंदर

अलंकापुरी, नाम  दिले मनोहर
इंद्रायणी  काठी, सुंदर ते मंदिर
जागृत देवस्थान, असे सिद्धेश्वर
स्थापले इंद्राने,शिवलिंग ते खास
करुनी तप, केले प्रसन्न शिवास
निकट असे, सुवर्ण पिंपळ तरुवर
घाली प्रदक्षिणा, साध्वी लाखभर
इच्छापूर्ती होई,साध्वीची लवकर
माघारी आला, तिचा हो  भ्रतार
समाधी ज्ञानियाची, असे संजीवन
झाले पवित्र,हे आळंदी तीर्थस्थान
असे समाधीवर,अजानवृक्ष सुंदर
धरी छाया,  ज्ञानेश्वर समाधीवर
सानिध्यात बसले, वृक्षाच्या  जर
आगळेच समाधान,मिळे खरोखर
आजोळ ज्ञानियाचे,असे आळंदीत
मुक्काम पालखीचा,तेथे एक रात्र
भजन , किर्तन चाले रात्री आनंदात
प्रस्थान पालखीचे, होई ते झोकात