जगण्याचा प्रवास करताना;
माझ्या मनाची गाडी भरधाव धावत होती;
माझ्या माणसांबरोबर जगताना;
मी किती पुढेच निघून गेलो.
कसा झाला प्रवास,किती झाला प्रवास;
हे आठवता म्हणून आठवत नाही;
इतका मी माझ्यातच;
वेड्यासारखा मशगुल होतो.
मध्येच प्रयत्न केला मी;
डोकावण्याचा माझ्या जगण्याच्या प्रवासात;
अन् मला भीतीच वाटून गेली;
मी तर आता होतो शेवटच्या टप्प्यात.
इथे मला आधार हवा होत;
जन्मभर जोपासलेल्या नात्यांचा, माझ्या माणसांचा;
पण ते तर त्यांच्यातच मशगुल होते;
त्यांच्या लोकांबरोबर हसण्यात.
दोष मी त्यांना दिलाचं नाही;
कारण जे मी केलं त्याचीच पुनरावृत्ती होती;
अन् म्हणूनच मी नाइलाजाने;
माझ्या जाण्याची तयारी केली.