चाहूल

घडले आज हो कांहीतरी

वसंत फुलला  गालावरी
फुटे  पालवी  वेलीवरती
आली लाली गालावरती
पीस तरंगे ते वाऱ्यावरती
हेलकावे मन स्वप्नावरती
मनमोराचा सुंदर पिसारा
खुदकन हसे हर्षित चेहरा
घरात तुरुतुरू चाले कशी
हळुच  खार  पळते जशी
पूर्ण झाली ती मनोकामना
आनंद  हा  पोटात मावेना
कळले आनंद गुपित मज
चाहुल बाळाची लागली तुज