दिंडी

आला  आषाढाचा  हो  मास

ओढ  लागे  आम्हांस  खास
जाण्यास  विठूच्या  पंढरीस
डोळा  पाहण्यास विठ्ठलास
इंद्रायणीच्या आहे हो तिरी
माऊलीचा  निजधाम  जरी
माऊलीची इच्छा असे परी
जाऊन पाहू विठू हो पंढरी
निघे  ग्यानबा  दिंडी  जरी
मुक्काम  होई  पुण्यनगरी
जनता  लोटे  दर्शना  सारी
मना समाधान हो झडकरी
वारकरी निघती पायी चालत 
विठ्ठल  नाम मुखाने गात
चालती पावसात हो भिजत
दंग होती विठ्ठल  नामात
सासवडच्या  मुक्काम गावी
सोपान  दिंडी  हो वाट दावी
इच्छा ज्ञानोबाची भेट व्हावी 
सोबत त्यानी  पंढरीस द्यावी
आषाढीच्या शुद्ध  एकादशीस
पोहोचती दिंड्या  हो पंढरीस
डोळा पाहती  ते  विठ्ठलास
सार्थक  होई  जन्माचे  खास