मनातल्या मनात मी..

अर्पणपत्रिकाः मल्लिके, तुझ्यामुळेच हे लेखन शक्य झाले.

मूळ गीताचा दुवा -दुवा क्र. १ 


मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा बराच देह पाहतो
     अशीच रोज न्हाऊनी
     लपेट वस्त्र एक ते
     दरेक अंग आपले
     उन्हात ठेव मोकळे
तशा स्थितीतल्या तुला बघून जीव रंगतो
     मनातल्या नभांगणी
     लवून थांब तू मुली  
     झकास अंतरंग तू
     मलाच दाव आपुले 
सदैव पाहण्यास मी तुला टपून राहतो  
    अजून जर तुला न ठाव
    प्रसिध्द व्हायच्या परी
    बये, विचार जाणत्या
    महेश भट्टला तरी 
समीप येऊनी तुझा मरंद तोच चाखतो
    तसा न राहिला अता
    मनात चोरटेपणा    
    तुझाच चित्रपट सदा
    किती किती करी खुणा 
पहा कसा रिमोटही तुझ्यामुळे सळाळतो