मैत्री

जेंव्हा असतो,  उदास एकांत

भेटतो तेंव्हा,  कोणी निवांत
मरगळ जाई,  मोद  मनात
निर्माण होई,मैत्रीची सुरवात
मैत्री असावी ती,विशुद्ध पवित्र
तीत नसावा, स्वार्थ तिळमात्र
ठराल मित्र, म्हणुनी हो पात्र
मिळेल आनंद,फुलतील गात्रं
मैत्री घालवे निराशा मनांतील
मित्र, जेंव्हा तुम्हांस भेटतील
आनंद लहरी,मनांत उठतील
पटेल महत्त्व,मैत्रीचे जगातील
परित्यक्त  महारथी  कर्णाला
केले मित्र, दुर्योधनाने त्याला
बहाल केले, हो  अंग देशाला
बनविले राजा, निज मित्राला
दिली साथ,कर्णाने दुर्योधनाला
करुनी नेतृत्व,तो गेला युद्धाला
प्राणपणे विरश्रीने, खूप लढला 
धारातिर्थी पडून,जागला मैत्रीला