पिंजरा

स्व. व्ही शांताराम मराठीतील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व. हिंदी, मराठी भाषेत बोधपर चित्रपट काढण्यात त्यांचा हात खंडा जबरदस्त! प्रत्येक कलाकारा कडून कथेनुसार व पात्राच्या मागणी नुसार अभिनय कसा काढून घ्यावा? चित्रपट स्वतःचे असले तरी प्रत्येक चित्रपटात मीच नायक होईल असा दुराग्रह नसणारा. कलेसाठी जगणारा आणि कलेसाठी मरणारा विरळा माणूस.

आयुष्यात ह्या माणसाने चित्रपटसृष्टीला अनेक नवीन नवीन चेहरे दिले. अनेक उत्तम चित्रपट दिले त्या उत्तम चित्रपटांच्या मालिकेतील एक सर्वांग सुंदर चलचित्र म्हणजे मराठीतील पिंजरा. आता पर्यंतच्या चित्रपटात दाखवलेले नायक म्हणजे सर्वगुण संपन्न, गरिबीतून चांगल्या गुणांनी यशस्वी होणारे. पण ह्या चलचित्राची वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात यशोशिखरावर पोहचलेल्या सर्वगुण संपन्न अश्या नायकाचे अधःपतन इतक्या उत्कृष्टपणे सादर केले आहे की व्ही शांतारामांनी मला वाटत बापपण सिद्ध केलंय. साधी सरळ कथा पण तिची सुरेख गुंफण, त्यातले एक एक पात्र म्हणजे लाजवाब जिवंत केलेत.

बरेच जणांकडून ऐकलंय की कथा सुमारच होती पण लागूंनी जिवंत केली. अभिनय असा लाजवाब केला की चित्रपटाने विक्रम केला. लागूंच्या अभिनयाबद्दल कोणात छाती आहे की तो बोलू शकेल? अहो हिंदी पटातील अमिताभ पहिलवानाला सुद्धा लावारिस चित्रपटात ज्याने आसमान दाखवलं त्या माणसाच्या अभिनयाबद्दल दुमत असणारा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात सापडणे मुष्किलच, अभिनय सर्वांचे खरंच छान झाले. नदीवर स्वतःच्या कपड्यात लपेटून बाईची कापड धुणारा निळु फुले असो की पाटलाचा मुलगा सर्वच सुरेख.

ह्याच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बैठकीची लावणी हा एक प्रकार! काय अप्रतिम लावणी आहे ती तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल........ एकूणच हा चित्रपट सर्वांग सुंदर. तरुण वयात आलेल्यांनी अवश्य पाहावा असा! अर्थात चित्र मुद्रित थाळीवर