चालत होतो मनात येईल तिकडे
पळत सुटलो ऐकून मनाचे साकडे
परत वळून बघितले तर काहीतरी मागे राहिले
कदाचित जवळच्यांच्या अपेक्षांचे ओझे
परत फिरलो बघाया पेलता येईल का?
पेलल्यावर सुद्धा पळता येईल का?
ओझे तर आपलेच होते
पळता येत नसले तरी चालता येत होते
मनाशीच ठरविले ओझ्यासह चालने
चालता चालता आपल्यांच्या सोबत राहणे
उगाच पळून दूरुनंच जवळच्यांना बघण्यात काय अर्थ
आपलेच सोबत नसले तर हे जगणेच व्यर्थ