दुटप्पी ?

काल मनसैनिकांनी अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यांना मारहाण केली.

दुपारी राम कदम लोकमतला बोलत असताना मध्येच उठून "आजतक"ला गेले आणि तिथे (बहुदा) हिंदीतून स्वतःची भूमिका मांडली. (असं निखिल वागळे म्हणाले)

इतर मनसे आमदार, मुख्यमंत्री, आणि इतरांनी जे मुद्दे मांडले तेही हिंदीतून.

लोकमतचे वागळेही अबूंना प्रश्न विचारताना हिंदीतून विचारत होते.

हा दुटप्पीपणा नाही का ? 

काहीही झालं तरी "महाराष्ट्रात" मराठीच बोलणार मग ती माध्यमांना समजो किंवा न समजो, अशी भूमिका का घेतल्या जात नाही? हे हिंदी वाहिन्यांसमोर झुकणे नाही का ? मग उगाच "हमे गर्व है की हम मराठी है" का म्हणायचं ?

तुम्हाला काय वाटतं?