तूच तू माझे जीवन....
तुझे डोळे की नशा ही
तुझे रूप रक्तात वाही
तू स्पंदन हृदयाचे
तू बंधन या मनाचे
मी वेडावून जातो
या लाटेत वाहातो तूच तू माझे जीवन....
कधी चंचल मृगनयना तू
कधी भावुक मोर पिसारा तू
कधी लटका राग थोडा
कधी हसरा मंद वारा
तू रिमझिम रंगांची
तू रेशिम किरणांची तूच तू माझे जीवन...
तूझ्या श्वासांची मखमल
किती नाजुकशी कोमल
तू बहरल्या फुलाची
तू गंधित वाऱ्याची
तुझा स्पर्श.. ती धुंदी
मी बेहोष.. बंदी तूच तू माझे जीवन...
माझ्या नजरेने पाहा तू
माझ्या डोळयात राहा तू
तू कविता अंतरी ची
तू राणी या गीताची
तू आशा स्वप्नांची
तू राधा या कृष्णाची...
तूच तू माझे जीवन ~~~~
मनिष...