सावळ्याची तनू सावळी
सावळीच सावली
का न मी झाले सावळी?
राधा खंतावली
सावळ्याच्या मुरलीसवे
सुर ही सावळे
'काय माझे झाले असे हे'
राधेला ना कळे
गंधावली गवळण वेडी
रास सावळा खेळी
सावळ्याची प्रीत मनी अन
सावळा जळी स्थळी
पैलतिरी सावली सावळी
राधिके साद घाली
गेली वेडावुनी गोपिका
बासरी धुंदावली
प्रीत सावळी, भाव सावळा
श्याम तो सावळा
सुखाची चाहूल सावळी
जग राधे सावळा
विशाल