शब्द

पडलो होतो पुस्तक वाचत

शब्दांची येई लक्षात गंमत
शब्दात आहे किती रंगत
असतात अर्थपूर्ण सुसंगत
शब्द असती, कांही प्रेमळ
कांही असती,कठोर जहाल
तर असती,कांही खट्याळ 
मात्र कांही  असती, रटाळ
शब्द असते, शस्त्र  दुधारी
घायळ करते, ते मने सारी
शब्दच देती,मनास उभारी
अजरामर करती ज्ञानेश्वरी
शब्दांचे असे,सौंदर्यच न्यारे
शब्दच उडवे, हास्य  फवारे
शब्दच जपती,स्मृतीकिनारे
शब्दच उधळे,कौतुक फुलोरे
म्हणुनी वापरा शब्द जपून
शब्दात ते मार्दव, आवर्जून
करेल घात, बोलले  तोडून 
जोडा नाते,हो मधूर बोलून