मटकी पापड

  • पोह्याचे पापड ४ , उडदाचे पापड २ , मोड आलेली मटकी ३/४ वाटी
  • कांदा १ मध्यम, कोथिंबीर, लिंबू, मीठ, लाल तिखट.
१० मिनिटे

१) मटकी थोडे मीठ घालून वाफवून घ्यावी. ( गार होऊ द्यावी.)

२) दोन्ही प्रकारचे पापड भाजून , जाडसर चुरून घ्यावेत.

३) कांदा , कोथिंबीर बारिक चिरून घ्यावी.

४) वरील तिन्ही गोष्टी आयत्या वेळेला एकत्र करून त्यात चवीपुरते मीठ, लाल तिखट घालवे आणि वरून लिंबू पिळून हलक्या हाताने एकत्र करावे.

( अतिशय रुचकर आणि चटपटीत लागतो ह पदार्थ आणि कोशिंबीर / लोणच्याला चांगला पर्याय पण होतो.)

उडीदचा पापड नाही घातला तरी चालतो.

सौ. आई