छोटंसं काम..

छोटंसं काम..

==========================
.
.
आई माझं तुझ्याकडे आहे छोटंसं काम;
बाबाच्या बारशात मी कुठे होतो सांग..?
आज नको बहाणा नि नको म्हणू थांब,
बाबाच्या बारशात मी कुठे होतो सांग..?
इतकी सारी खेळणी अन मला ठेवले लांब..!
बाबाच्या बारशात मी कुठे होतो सांग..?
.
फोटोतला बाबा दिसे किती छोटूसा बाळ
माझ्याशी तेव्हा तो खेळायचा का सांग..?
नको हसू हसवू अशी मी फसायचा नाही,
जाणून घ्यायचं आज मी ठरवलंय ठाम.!
आई माझं तुझ्याकडे आहे छोटंसं काम
बाबाच्या बारशात मी का नव्हतो सांग..?
.
माझी आजी तिच का गं बाबाची आई..!
आता ती तेव्हा सारखी का दिसत नाही..?
बाबाची आजी म्हणजे आजोबांची आई..
ती मला अजून कुठे कशी दिसली नाही..?
आई मी बाबावर रुसलो आहे आज..!
बाबाच्या बारशात आपण का नव्हतो सांग..?
.
कट्टीच घेऊ या आपण त्याच्याशी आज..
आपल्याला न घेता केला बारशाचा थाट.
.
.
==========================
स्वाती फडणीस.......................... १६११०९