यमुनेच्या पाण्यात, माधव होता खेळत
संगे गोपाळांच्या तो, होता किती मजेत
झाले होते तल्लीन, सर्वजण त्या खेळात
खळबळ माजली, अवचित त्या पाण्यात
होता नाग कालिया, पाण्यात वळवळत
घेत होता वेध कृष्णाचा, फुत्कार टाकत
घाबरले मग गोपाळ,पळाले हो नदीतीरी
विळखा घातला, कालियाने कृष्णशरीरी
दंश करण्यास हरीस, टाके फुत्कार विषारी
होता अवतार देवाचा, कृष्णास कोण मारी
केले मर्दन कालियाचे, दाखवुनी खरे रुप
निपचित कालिया, पाण्याशी होई एकरुप
कालिया मर्दन पाहून, गोपाळ आनंदित
कृष्ण पराक्रम सांगत, पळाले गोकुळात
ऐकुनी यशोदा, कृष्णाचा पराक्रम वृत्तांत
कवटाळे हरीस घट्ट, यमुनेच्या प्रांगणात