अलिप्त

मला वाटलं होत मी सुद्धा अलिप्त राहू शकेन;

माझ्यातल्या मी ला माझ्यापासून मी तोडू शकेन.

माझ्याच हृदयाचा मी; कणखर पाषाण करावा;

स्वतःलाच निहृदयी बनवण्याचा; वेडेपणा मी जपावा.

उगीचच हळहळायचो मी; दुसऱ्यांच्या वेदना पाहून;

माझ्याच वेदना निःशब्द याच;आश्चर्य वाटत राहून राहुन.

कितीदा घडायचं अस; मी माझ्या मनाला चुचकारणं;

मी सुखाला नाकारणं; अन् दुःखाने मला नाकारणं.

सगळ्यांनीच घातलेले आपल्याभोवती; सोवळ्यांचे बुरखे;

षंढ तत्त्वज्ञानाच्या गप्पा करून; मला राहावे लागले परके.

मी स्वतःलाच आयुष्यभर; कंगाल करत गेलो;

अन् लोकांकडून दानशूर कर्णांच्या; गप्पा ऐकीत गेलो