~~ माझा 'वसंत' बहरलाच नाही ~~
जिच्या सोबतीची इच्छा होती
ती माझी झालीच नाही
तिच्या प्रेमात होरपळलो मी
तिने 'आग' पाहिलीच नाही
प्रेम , वचने सर्व वाळुचे मनोरे
पायाने सहज तुडवताना
तिने खाली पाहिलेच नाही
डोळ्यांदेखत मी बुडत गेलो..
तिने हाक ऐकलीच नाही
पाषाण मनाने तिने
फक्त खेळ होता खेळला..
माझ्या मनाच्या ठिकऱ्या उडताना..
तिला कधी दिसलेच नाही
मनातली सुंदर चित्रे
कितीदा रंगवली.. पुसली
चुरगळल्या कागदांचा ढीग नुसता
पाहिजे तसे उतरलेच नाही
आपलेच नशीब... आपलेच दैव
कमनशीबी मी , सदैव
तिचे 'ऋतु' नेहमी फुलले
माझा 'वसंत' बहरलाच नाही !!