आळस आहे मानवाचा महाशत्रू एक
जडला ज्यास हतबल झाला तो नेक
केले जर शरीराचे, ते फाजील लाड
आमंत्रण देती, आळसाला कसे मूढ
जर पाहिलीत, दिवास्वप्ने कल्पनेत
शिरला समजावा,आळस तुमच्यात
भिनल्यास आळस, तो शरीरात जर
संपते विवेकबुद्धी, कशी लवकर फार
पुरवून देहाचे चोचले, पाडती प्रघात
निर्माण करे अनेक रोग, करे घात
म्हणुनी सोडा आळस,व्हा तुम्ही चपळ
कार्यरत रहा, ठेवा काबूत मन अचपळ