पाहत होतो बसुनी किनारी
अथांग सागराचे स्वरूप उरी
प्रहर सकाळचा होता जरी
सागर दिसला खूप मनोहारी
येत होत्याच लयीत हो लाटा
पाण्यात होतच नव्हता तोटा
जलचरांचा निवास, तो पोटा
संथ वाहतोय,तो सागर मोठा
सूर्य येत असे मग डोक्यावर
सागरी लागे ओहोटी झरझर
उघडी पडे वाळू ती मऊ शार
वाटे चालावे अनवाणी त्यावर
चालताना त्या रेशीम वाळूवर
गुदगुल्या होती पायी हळुवार
लाटा पायी थडकती सभोवार
अदभुतसी अनुभुती चरणावर
सूर्य ढळुनी होते,हो संध्याकाळ
माजे सागरी,भरतीची खळबळ
रौद्ररुप लाटा, वाहती खळखळ
शीतल समीरण वाहे झुळझुळ
पाहुनी असा बदलता हा सागर
येई मनात माझ्या बघा विचार
असतो का हा मानवाचा प्रकार
बदलतो रंग,घेई विविध आकार