तक्रार .... !

सखे मी शोधितो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले ...!

का चांदणे सदा बरसले तुजवरी ?
बरसताना कसे मलाच विसरले...?

मोहरला देह ओलावली काया तुझी,
वाटेवरून माझ्या मेघही परतले...!

सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदू..,
क्षितिजावरले माझ्या धृवही सरकले !

थांबली पुनव, सखे तुज स्वागता..,
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले!

विशाल