कशाला मला शोधता इथे

शोधत राहील मला कुणीतरी;

माझ्या कवितेच्या पात्रांमध्ये;

अहो इथे सगळं पुस्तक जरी वाचलं;

तरी ओळखू नाही शकत कुणाला कुणी .

या कविता तर कल्पना असतात;

जिचे कितीतरी भाग हरवलेले असतात;

तरीही माझ्या कवितांमध्ये मला शोधण्याचा;

वेडेपणा लोक कसा काय करतात.

लोक लावतात अंदाज माझ्या कवितेचा;

बनवतात कथा जशी हवी त्यांना;

काहींना मात्र गवसत जातो;

त्यांच्या हरवलेल्या 'स्व' चा तुकडा.

कोणी मला तरी विचारावं;

कुठे असतो मी या कवितेत;

खरं सांगायचं तर माझ्यासाठी मी;

कोलाज असतो या कवितांचा.

कशाला वेळ घालवता वेड्यासारखा;

काहीच नसत कवितेत तुमचं माझं;

फक्त ति  सृजनतेच प्रतीक असते;

तुमच्यामाझ्यात लपलेल्या.