स्मृतिदिन-२६/११

करुया साजरा स्मृतिदिन, लढवय्या  शहिदांचा

वाचवले मुंबईस करुनी, प्राणत्याग हो स्वतःचा
आठवण येते त्यांची, प्रकर्षाने आम्हांस अजुनी
वाटते उठून यावे भेटण्या, विझलेल्या राखेतूनी
होते क्रूर, मगरूर, दहशतवादी  ते पाकिस्तानी
केला घात या  देशाचा, येऊनी  समुद्रमार्गातुनी
गोळीबार, जाळपोळ करुनी, केले थैमान त्यानी
अकस्मात असा हल्ला होईल,नव्हते ध्यानीमनी
होते ताजमहाल हॉटेल, राजधानी मुंबईची शान
केले भस्मसात त्यास, आतंकवाद्यानी हो  तीन
ओलिस ठेवले ग्राहकास, मारले त्यात कित्येक
होते ग्राहक देशविदेशातील, तसेच ते स्थानिक
गजबजले होते श्री छत्रपती शिवाजी स्थानक
होते हो रोजच्या कामाच्या गडबडीत नागरिक
घाला घातला त्यांच्यावर काळाने हा अचानक
मेले जागीच कित्येक, सैरावैरा पळती अनेक
त्यातही शूर शिपाई देती, हल्ल्यास तोंड नेक
टिपला सर्वासमक्ष, आतंकवादी त्यानी एक
कल्पनाही नव्हती शिवली शहिद नागरिकास
परतणार नाही आज, ते आपुल्या घरकुलास
सोडले नाही आतंकवाद्यानी, कामाइस्पितळास
कामी आले तेथे, पोलिस अधिकारी संरक्षणास
शर्थ केली मुंबई पोलिसांनी, खूप अखेर पर्यंत
पकडले एका आतंकवाद्यास त्यानी, हो  जिवंत
कळले होता हा डाव पाकिस्तानचा,  चौकशीत
प्रणाम करती भारतवासी शहिदांना झोकात