कारण काय?

सगळे म्हणतात कुठेतरी;

हरवून गेलंय माझा हसणं;

मी माझे पंख मिटलेत;

अन् आवाजातही उदासिची लकेर.

उगीचच भिरभिरणाऱ्या पापण्या;

अखंड इकडेतिकडे धावणारी नजर;

आता थांबूनच गेली;

कुठेतरी अचानक कधीतरी.

हसताना माझ्याभोवती;

दुनिया सारी आनंदात;

मी पकडलेला असतो;

एक धागा निराशेचा.

मग मीच विणत जातो एक;

मोकळी ढाकळी उदासिची वीण;

पण कारण या उदासिच;

मी ही नाही अन् कोणीच नाही.

सगळ्याला कारण हे जगणंच;

ज्यान् उडी मारली कड्यांवरून;

आता हे जीवन चाललं तरी दुखत;

अन् हे थांबलं तरी ठणकतं .