एका स्त्रीच्या विश्वासाची व्याख्या;
तुटत असते दररोजच तशी;
पण हातातून पडून फुटलेल्या काचेसारखी;
तिला गोळा करून फेकून देते ती.
तिला कदाचित माहीतच नसते;
बाहेरची झगमगाटी दुनिया;
म्हणूनच ती करत नाही सामना;
तिच्या पुरषासाठी वेड्या.
तो पुरुष जो अवघड जातानाही;
बरंच काही वाचवतो; वाचवायचा प्रयत्न करतो;
स्त्रीच्या निष्पाप विश्वासाच्या व्याख्येला;
तो जपण्याचा प्रयत्न करतो.
बऱ्याच वेळा हे शक्य नसत त्याला;
या पुरुषांच्या दुनियेत; पुरुष होण्याच्या प्रक्रियेत;
तरीही ठेचकाळत; रक्तबंबाळ होत तो घेउन येतो;
स्त्रीला काचेसारख्या विश्वासाची भेट.
घराच्या उंबरठ्यावर येतो तो;
तेव्हा दमलेला तो अडखळतो;
अन् तिथेच त्याने जपून आणलेल्या विश्वासाला;
जाणता अजाणता तडा जातो.