चकितच झालो

जाताना;चोहींकडे दाटलेल्या अंधाराच्या ;

तळागाळातून जेव्हा मी वर आलो;

माझ्यातलं  अन् सूर्यातलं अंतर;

तेवढंच म्हणून चकितच झालो.

ज्या सूर्याने मला कधीच नाही;

त्याच्या प्रकाशाची सहानुभुती दाखवली;

जिच्या आशेवर जगताना;

माझ्या डोळ्यात कल्पना होती आकाशाची.

खरतर मी सूर्याला कधी माझ्यात;

प्रवाहीत असल्याच अनुभवलंच नाही;

पुस्तकात कधीकाळी वाचलेलं;

सत्यात कधी अवतरलंच नाही.

अजूनही माझा प्रवास सुरूच आहे;

त्या अंधारापासून ते या अंधारात;

अन् माझा सगळा जन्म जातोय;

त्या भास्कराशी नात ओळखण्यात.

सगळ्या वेळा निघून

मी असा काळाच्या वळणावर उभा;

एका नव्या सुरुवातीचा विचार करत;

जिथे आशेचा प्रकाशच संपून जातो.