तू नक्की येशील...

मला माहितीये, तू नक्की येशील...

श्रावणातील सायंकाळी मेघ भरून येताना,

दाट काळोखात मी एकटी चालत जाताना,

बाहेरच्या पावसाचं भान नसेलंही कदाचित

पण डोळ्यांतील अश्रुंना वाट करून देताना,

त्यातंच अडखळंत ठेचकाळंत पडताना,

बेभान होऊन चिंब भिजताना

येणारा प्रत्येक थेंब अंगावर झेलताना,

विजेची फिकीर न करता पुढे जाताना,

समोर असलेल्या अंधारात स्वतःला झोकून देताना

तू नक्की येशील,

मला सावरून घ्यायला...

अंधाराला दूर लोटून लख्ख प्रकाशात न्यायला,

आयुष्याच्या प्रत्येक श्वासाला नवा अर्थ द्यायला...

मला माहितीये तू नक्की येशील...!!!