गोरी गोमटी नार असे मी
पंचक्रोशित असे तो डंका
मला सुंदरा म्हणती बरं का
डोळ्यात माझ्या मादक अदा
घुसते मी तुमच्या काळजात
घायाळ करुनी सोडते बघा
धरुनी ठेवा, काळीज बर का
बांधा माझा,असतो सडपातळ
चवळी शेंगेपरी,पाहा लवचिक
नाचत ठुमकत,येताना पाहून
घायाळ करते, अदाच रसिका
पायात माझ्या पैंजण थिरकती
तालात त्याच्या रसिक डोलती
सुरात देहभान आपुले विसरती
ठाव घेते मी काळजाचा बरका