संशय

नाकाच्या शेंड्यावरचा राग
हि तर खरी निशाणी आहे प्रेमाची
देवा शपथ खरं सांगतो गं
तुझ्याशिवाय कोणी नाही

परवा भेटलेली रेखा ती...
अग! ती तर सुन्याची बहीण आहे
तिच्यात माझ्यात तसं काही नाही
ति तर मैत्रीचीच वीण आहे

एवढा संशय बरा नव्हे
आपल्याच माणसावर बरं!
मला वेळ थोडाच आज
अग शिल्लक अजून तीन आहे