शोकांतिका

वर्षामागुनी वर्षे गेली, दोन तपांचा काळ लोटला

विसरून गेले लोक आज, भोपाळवायू दुर्घटनेला
एकोणीसशे चौऱ्याऐंशीला, वायू गळती झाली हो
चार हजार माणसे,हकनाक मृत्युमुखी पडली हो
वीस  हजार माणसे, कायमची अपंग  झाली  हो
पण लाख लोकांचे संसार, उध्वस्त ते  झाले  हो
झाले  कित्येक, अंध, मुके, अर्धांगवायूने  पिडीत
क्षयरोग, दमा, चर्मरोग असे असाध्य रोग जडीत
चटका बसला, दोन पिढ्यांना, या वायूगळतीचा
कोण असे जबाबदार हो, या अश्लाघ्य बेपर्वाईचा
गरीब जनता घाले सांकडे, निष्क्रिय सरकारकडे
सरकार चाले कूर्मगतीने, प्रयत्न ते पडती तोकडे
काळ लोटला दोन तपांचा, तरी मिळे ना मदत हो
काय करावे, कुणा भेटावे, कळत नसे जनतेस हो
टिपे गाळती,वाट पाहती,गरीब जनता मरणाची हो
येईल दया का मृत्यूस, हाल मिटवण्या जनतेचे हो
आहे ही शोकांतिका मानव जातीच्या मदतीची हो
पाहे स्वार्थ हा  नेतागण, काय पडले दुसऱ्याचे हो
देव करो नि असे ना घडो अघटित भविष्यात हो
घेईल दक्षता सरकार, आशा करू या सर्वजण हो