नाचतेस घरी तु जेव्हा.....

नाचतेस घरी तू जेव्हा

जीव घाबराघुबरा होतो

हृदयाचे वाढती ठोके

शेजार बावरा होतो ॥

हत्तीण घरात शिरावी

प्रसंग तसा ओढवतो

इशा ही दिशाहीन होते

आहने चा पायच अडतो ॥

येतात आप्त दाराशी

धूम ठोकूनी जाती मागे

राणीच्या बागेमधला

तो मोर ही न्रुत्य विसरतो ॥

तुझ्या भयाण या नाचाला

तव भकास सुरांची साथ

हिमेश चा आवाजही येथे

कोकीलकूजन भासतो ॥

तू सांग प्रिये (? ) मज काय

मी सांगू मित्रसख्यांना

तुझा अजब न्रुत्यप्रवेशाचा

मी खेळ सदैवच झेलतो  ॥

ना अजून झालो मोठा

स्वरचित लिहिण्याइतुका

"मनोगता" वर पहिला कागद

विडंबनातून सादर करतो ॥

-- म ह १२