अरबी कवी लाबी आणि वेद...

     गीता प्रेस, गोरखपूरने प्रकाशित केलेला जानेवारी १९९९ चा ’वेदकथाङ’ वाचनात आला. त्यातील "भगवान के साक्षात वाङ्मय स्वरूप हैं ’वेद’" या हिंदी भाषेतील लेखाच्या* उत्तरार्धाचे भाषांतर खाली उद्धृत केलेले आहे -
      'वेदभगवंताशिवाय विश्वाचे कल्याण होणे कधीच शक्य नाही आणि मानवाचे कल्याण साधून देणारा वेदांहून चांगला असा अन्य मार्ग नाही. हे आम्ही (भारतीय) म्हणत नाही, परंतु हे तथ्य तर पंचवीसशे वर्षांपूर्वी अरबी भाषिक कवी लाबी याने कथिले आहे. लखनऊचे एक वर्तमानपत्र ’आर्यमित्र’च्या ऑक्टोबर-१९६८च्या अंकात एक कविता छापली होती, ज्यात वेदांच्या अद्भुत महिम्याचे वर्णन केलेले आहे. ती मूळ अरबी कविता अशी आहे-

’अया मुबारकल जर्जे योशेय्ये नुहामिनल ।
हिंदे फाराद कल्ला हो मैव्यो नज्जेला जिक्रतून ॥१॥
बहल नजल्ले पतून एनाने सहवी अखातून ।
हाज ही युनज्जेलर स्लोजिकतार मिनल हिंदुतून ॥२॥
यक्लून ल्लाहया अहलल अजे आलमीन कुल्लहम ।
फत निऊ जिक्र तुल वेदहक्कन मालम युनज्जे लहून ॥३॥
वदो वालम नुक्ष साभवल मुजर मीन ल्लहेतन जीलन ।
फ ऐनमा अखैयो मुत्तने अस्यों वशरेपों न जातून ॥४॥
व अस नैने हुआ ऋक न अतर वा सदीनक अखुव्रतून ।
न अस्नात अला अदन ब्र होन मश अरतून ॥५॥’

या कवितेचा जो अर्थ त्या लेखात दिलेला आहे, तो असा -

१) हे हिंदुस्थानाच्या पुण्यभूमे, तुझा आदर करण्यायोग्य अशीच तूं आहेस, कारण तुझ्याच (सहवासात) ईश्वराने सत्यज्ञान प्रकाशित केले.
२) हे चार वेद ईश्वरीय ज्ञानरूप आहेत. ते आमच्या मनःचक्षूंना आकर्षक व शीतल अशा उषेची प्रभा देतात. परमेश्वराने (अनेक) पैगंबर अर्थात ऋषिंच्या रूपातून हे चारही वेद प्रकाशित केले.
३) पृथ्वीवर राहाणाऱ्या सर्व जातींना ईश्वर उपदेश करतो की, मी वेदांतून जे ज्ञान प्रकाशित केलेले आहे, ते तुम्ही तुमच्या जीवनात क्रियान्वित करा. त्यानुसार वागा. हे निश्चित की वेदांरूपी ज्ञान परमेश्वराने दिले आहे.
४) साम व यजू असे खजिने आहेत, जे परमेश्वराने दिले आहेत. हे माझ्या बंधूंनो, तुम्ही यांचा आदर करा, कारण हे आम्हाला मुक्तीची शुभ वार्ता देतात.
५) चार वेदांतील ऋक व अतर (अथर्व०) आम्हाला विश्वबंधुत्वाची शिकवण देतात. हे दोन दीपस्तंभ आहेत, जे आम्हाला त्या लक्षाकडे -विश्वबंधुत्वाकडे- जाण्याचा मार्ग दाखवितात, आम्हाला सजग करतात.

(* सदर लेख ग्रंथकर्त्यांकडे श्रीशिवकुमार गोयलद्वारा पाठविला गेला आहे. )

         ज्यांना अरबी भाषा अवगत आहे, अशा मनोगतींनी या कवितेचा अर्थ मराठीत समजावून द्यावा अशी विनंती आहे.