स्वाईन फ्लू आला --- स्वाईन फ्लू आला;
कुत्री सगळी घाबरून गेली;
एकमताने झाली गोळा चांदणी चौकात---!
एकमुखाने घाबरत घाबरत चर्चा झाली -!!
मोत्या ,टॉमी, राजा, टायगर;
अकलेचे तारे तोडू लागले;
स्वाइन फ्लू या विषयावर;
प्रत्येकजण काहीबाही बोलू लागले. !
"आपण किती प्रामाणिक वागतो;
आजच्या घडीला वंचित झालो माणसाला;
देत नाहीत फिरकून कुणी दारासमोर;
हाड् हाडच्या बोलात मौताद झालो दूध चपातीला.!!
कुणाच्या दारात उभे राहण्याची चोरी;
पाहतात विचित्र नजरेतून सारी;
पहिले मास्क बांधून या दारी;
"घाबरट कुठचे? देव तारी त्याला कोण मारी? "
माणसांनाच होतात कसे हे फ्लु?
प्राण्यांच्याच नावे का सरे आजार?
कधी बर्ड , कधी चिकन, कधी स्वाइन;
आमच्या नावे का मांडलाय यांनी बाजार.?