फुलपाखरू

हे असं का? ते तसं का?
या द्विधा मनस्थितीत,
प्रत्येकालाच जगावं लागतं
कधी मनासारखं,
कधी मनाविरुद्ध
तडजोड करत,
आयुष्याला सामोरं जावंच लागतं
प्रवाहाविरुद्ध वाहताना,
मायेची बंधनं झुगारून,
मर्यादेची चौकट ओलांडून
पुढे पाऊल टाकावंच लागतं,
कारण....
सुरवंटाचं फुलपाखरू होऊन
मनसोक्त विहरण्यासाठी
कोशातून बाहेर पडावंच लागतं............