स्वागत करतो मनापासुनी, या सुखानो या
चिंब भिजवुनी टाका मजला, या सुखानो या
कष्ट केलेत जीवनात या, मी सच्छील
मिळवले कष्टाने त्या, धन मी विपुल
खर्च करुनी धन, बांधिले मी घरकुल
सजवुनी घरकुल,वाट पाहतो निश्चल
या सुखानो या.......
वृद्ध माता पिता राहती, आनंदे या घरात
सजवती घरकुल, पत्नी मुले किती मजेत
शेजारीही राहती आनंदे, किती द्वेषरहित
पाहुनी आनंद त्यांचा, कष्ट विसरे क्षणात
या सुखानो या .......
असे अधिष्ठान देवाचे पवित्र, हे या घरात
व्रत वैकल्ये साजरी होती, ती भक्तिभावात
आनंद सणांचा लुटती, सारे किती मजेत
जेथे असते माणुसकीचे, नाते असे प्रेमात
या सुखानो या ........
आनंदित होती, सर्व अतिथी स्वागतात
आपुल्या परिने करती सेवा त्यांची प्रेमात
चहापान करुनी त्यांचे, पाठवती हो वेळेत
आशीर्वाद लाभती त्यांचे, अशा या घरात
या सुखानो या .......
घरात ज्या गृहलक्ष्मी,रांधते अन्न रुचकर
तृप्त होतात कुटुंबिय, देऊनी वरती ढेकर
अन्नपूर्णेचा वास असे,जेथे असा सुखकर
कमी ना पडे कांहीही, ते घर बने खेळकर
या सुखानो या .........