कोरडा सुस्कारा सोडत
तो त्यालाच विचारत होता
हूं! अजून मी आहे तर?
आठवत आपला संसारपट
कधी चौकट, कधी फोटोकडे बघत
हूं! अजून मी आहे तर?
कपाटातील साड्या हातांनी
तर कधी ओल्या डोळ्यांनी बघत
स्वतःच म्हणे मी आहे तर?
आठवणीच्या जळवा सांभाळत
विरणाऱ्या सावल्या पुन्हा पुन्हा कुरवाळत
जाताना पण म्हणत,हूं मी आहे तर!