डोळ्यातून माझिया सखे ,काय गं तुला कळाले,
ना ओठांना कधी शक्य झाले, जे भाव माझ्या मनातले,
थरथरत्या पापण्यांनी, सहजी व्यक्त केले...
विरह यातना पाहुनी माझ्या, शहारा ही सये शहारला,
अश्रुंना पाहुनी माझ्या, आज पाऊस ही गहिवरला,
एका क्षणाचा जरी सहवास तुझा लाभला, अवघा जन्मच समजेन गं सार्थकी लागला....