श्रावणात खूप खूप बरसली, कडकडीत महागाई
उतरले नभातून अवचित, संकट कसे सांगू बाई
कळुनी आले आम्हां, सुख आता नशिबी नाही
महागाईस लवकर हो, उतरण्याची घाई नाही
देऊनी दोष नशिबाला, नाव देवा तुझेच घेई
स्वस्ताई होईल लवकर, स्वप्न धरूया मनी
जनक्षोभ होईल सत्त्वर, लक्षात घ्या ध्यानी
अश्वासनाने नुसत्या, उतरणार ना महागाई
रोजच्या जिनसा झाल्या, दुर्मिळ हो बाजारी
दुःखित होती ललना, आपुल्याच ग संसारी
भाली गृहिणीच्या लिही, महागाई ग सटवाई
रोजच्या भाज्यांच्या किंमती भिडती नभासी
खावे काय आता, कळेनासे झाले मनुजासी
हवा, पाणी खावे म्हटले, तर त्याचीही टंचाई