मखमली स्पर्श

मखमली स्पर्श तुझा

वाटे हवा हवा
अनुभव असे मजला
असा नवा नवा
होते निरागस निष्पाप
मम विश्वात गुंग
अवचित दिसला मला
मोहरून गेले अंग
भीती वाटे ती मजला
चोरून पाही तुला
कोणी पाहत नसेल ना
माझ्याच नजरेला
सुचत नव्हते कांही मजला
चैन नव्हते मनाला
छंद लागला वेडा मजला
पाहण्याचा रोज तुला
वाढल्या मग भेटी आपुल्या
नदीच्या तटी राती
घेऊनी माझा हात हाती
मोहरून गात्रे जाती
अनुभवे मी आज आगळीच
सुखद अनुभूती
वाटे हवीहवीशी संगत
तुझ्या स्पर्शाची ती